दिल्ली विधानसभा: कॉंग्रेसकडून बेरोजगारांना साडेसात हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होत आहे. ११ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज कॉंग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कॉंग्रेसच्या दिल्ली कार्यलयात जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. कॉंग्रेस नेते सुभाष चोपडा, आनंद शर्मा आणि अजय माकन यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात दिल्लीकरांना भरपूर आश्वसन देण्यात आले आहे.

बेरोजगार तरुणांना केंद्रस्थानी ठेऊन कॉंग्रेसने भरभरून आश्वासन दिले आहे. बेरोजगार तरुणांना महिन्याला साडेसात हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पदवीधर बेरोजगार तरुणाला पाच हजाराचे तर पदव्युत्तर बेरोजगाराला साडेसात हजार रुपये मानधन देण्याचे कॉंग्रेसने आश्वासन दिले आहे.