दिल्ली विधानसभा: भाजप, कॉंग्रेसनंतर ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होत आहे. ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. भाजप आणि सत्ताधारी आम आदमी पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. दिल्लीतील सत्ता कायम ठेवण्यासाठी आम आदमी पक्ष गेल्या पाच वर्षात केलेल्या कामावर मत मागत आहे तर भाजपकडून शाइन बागसह इतर मुद्द्यांवर केजरीवाल यांना लक्ष केले जात आहे. दरम्यान दिल्ली विधानसभेसाठी आम आदमी पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी मंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह नेते उपस्थित होते.

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महाविद्यालयीन गरीब विद्यार्थिनींना स्कूटर देण्याचे आश्वासन दिले आहे तर कॉंग्रेसने बेरोजगार तरुणांना साडेसात हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे.