दिल्ली विमानतळावर परदेशी नागरिक ताब्यात

0

नवी दिल्ली : एका परदेशी नागरिकाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या अमली पदार्थाचे वजन एकूण १४ किलो आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा प्रवासी कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सने प्रवास करत होता. विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. तेव्हा या प्रवाशाकडे १४ किलो मादक पदार्थ असल्याचे आढळून आले. सर्व बाबी सध्या तपासण्यात येत आहेत.