दिल्ली हिंसाचार: अमित शहांची केजारीवालांसह दिल्लीच्या नेत्यांसोबत चर्चा !

0

नवी दिल्ली: सीएए विरोधी आंदोलनाला काल दिल्लीत हिंसक वळण लागले आहे. हिंसचारामुळे जीव गेले आहे. मृतांची संख्या आता ७ वर पोहोचली आहे. आजही या हिंसाचाराची धग कायम आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह प्रमुख पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेतली तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, कॉंग्रेस नेते सुभाष चोप्रा, पोलीसा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.