नवी दिल्ली: तीन दिवसांपूर्वी दिल्लीत सीएए, एनआरसी आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहे. हिंसाचारात अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यात आले आहे. दगडफेक देखील करण्यात आले होते. आज चौथ्या दिवशी हिंसाचार झालेल्या परिसराची स्वच्छता सुरु असून सर्व परिसर स्वच्छ करून पूर्ववत केले जात आहे.
दिल्ली हिंसाचार प्रकरणावरून राजकारण सुरु झाले आहे. विरोधकांनी या घटनेला केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचे आरोप केले आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विरोधक आंदोलनकर्त्यांना भडकवित असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.