दिल्ली हिंसाचार: मृतांचा आकडा ७ वर !

0

नवी दिल्ली: सीएए विरोधी आंदोलनाला काल दिल्लीत हिंसक वळण लागले आहे. हिंसचारामुळे जीव गेले आहे. काल दोन जणांचा मृत्यू झाला होता. आज हा आकडा वाढला असून मृतांची संख्या आता ७ वर पोहोचली आहे. आजही या हिंसाचाराची धग कायम आहे. आज सकाळी देखील आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. ब्रह्मपुरी भागात दगडफेकीची देखील घटना घडली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलविली आहे.

काल घडलेल्या हिंसाचारात एका पोलीस कर्मचाऱ्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे.