दिवंगत वाजपेयी यांची अस्थी राज्यांकडे सुपूर्द

0

नवी दिल्ली-दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे देशभरातील नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी २८ राज्यांसाठी अस्थिकलश तयार करण्यात आले असून हे कलश भाजपाच्या सर्व राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते बुधवारी हे कलश सुपूर्द करण्यात आले.

यासाठी भाजपाकडून विविध जिल्ह्यांमध्ये अस्थिकलश यात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, देशभरातील १०० नद्यांमध्ये वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. याची सुरुवात राज्यांच्या राजधान्यांमधून करण्यात येणार असून त्यानंतर ते विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी याची माहिती दिली.