देहूरोड : दुकानासमोर लावलेली हिरोहोंडा पॅशन प्रकारातील दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार दिवसाढवळ्या भरवर्दळीच्या ठिकाणी घडला. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनोज ईश्वर अगरवाल (रा. ओमकार अपार्टमेंट, देहूरोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पुणे-मुंबई महामार्गावर टिजेएसबी बँकेशेजारी अगरवाल यांचे गोयल ट्रेडर्स नावाचे किराणा व भुसार मालाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकानासमोर आपली दुचाकी (क्र. एमएच14 डीडब्ल्यु 6754) लावून ते दुकानात काम करीत होते. सायंकाळी दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.