दिवसेंदिवस पक्ष्यांची घटत जाणारी संख्या चिंतेचा विषय

0

शहादा । मानवी हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत असून जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यामुळेच पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. पक्ष्यांची कमी होणारी संख्या हा चिंतेचा विषय असून, पक्षी वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असा सूर राष्ट्रसेवा दल व अंनिसतर्फे आयोजित ‘पक्षी वाचवा’ या कार्यक्रमात उमटला. कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

संयोजनात यांचा हातभार
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवादलाचे कार्याध्यक्ष मानकभाई चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सध्या पक्ष्यांच्या संख्येन होणारी घट चिंतेचा विषय असल्याचे ते म्हटले. कावळ्यांची भरणारी शाळा, चिमण्यांचा चिवचिवाट आज पाहायला आणि ऐकायला मिळत नाही. पक्ष्यांचा अधिवास टिकून रहावा, यासाठी जलपात्र वाटण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. तसेच संगीता पाटील, शंभुदादा पाटील, ईश्‍वर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रा.डॉ. विश्‍वास पाटील यांना साहित्यातील ‘पूर्णाचार्य पुरस्कार’ जाहीर झाला म्हणून शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राष्ट्रसेवा दल, ज्येष्ठ नागरिक संघ, जायंट्स व अंनिसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष महाजन, प्रदीप केदारे, अशोक पाटील, आरिफ मण्यार, प्रवीण महिरे, विजय बोडरे, प्रवीण सावळे, विपूल रोकडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू घोडे यांनी तर आभार रवींद्र पाटील यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. विश्‍वास पाटील उपस्थित होते. तसेच अंनिसचे ज्येष्ठ मार्गदर्शक व आदर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, फायरचे शंभुदादा पाटील, ईश्‍वर पाटील, अंनिसच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा प्रधान सचिव हंसराज महाले, जायंट्सचे भूषण बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

मानवी संवेदना विस्तारण्याची गरज
प्रमुख वक्ते प्रा.डॉ. विश्‍वास पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, माणसाला माणसाची काळजी घेण्याच्या परिस्थितीत पक्षी वाचवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. पूर्वी आपली आई आपल्याला एक खाऊ चिऊचा, एक खाऊ काऊचा सांगत आकाशातील चंद्राला मामाची उपमा देत होती. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता माणसं वाचवण्याची पाळी आपल्यावर आली आहे. म्हणून मानवी संवेदना विस्तारण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.