दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा उत्साहात!

0

शहरातून 121 स्पर्धकांनी घेतल सहभाग

निगडी : नाट्य संस्कार कला अकादमीच्यावतीने आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा हिंदी आणि इंग्रजी विभागातील स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यंदाच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड विभागातून तब्बल 121 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. नाट्यसंस्कार कला अकादमीचे हिंदी आणि इंग्रजी भाषेत नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करण्याचे यंदा पहिले वर्ष होते. स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ डॉ. विनय हुईलगोळकर, नाट्यसंस्कारच्या विश्‍वस्त संध्या कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर सदनमध्ये स्पर्धा आणि बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी स्पर्धाप्रमुख माधुरी ओक, अनुराधा कुलकर्णी उपस्थित होत्या.

नाट्यछटांमध्ये गोडी निर्माण व्हावी!
नाट्यसंस्कार कला अकदामीच्या विश्‍वस्त संध्या कुलकर्णी यांनी सांगितले की, पुर्वी इंग्रजी आणि हिंदी विषयातील नाट्यछटांची पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे या स्पर्धांना प्रतिसाद कमी मिळत होता. मात्र यंदा दोन्ही भाषांतील नाट्यछटांची पुस्तके उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमधील नाट्यछटा सादर करण्याचा उत्साह वाढला. इंग्रजी आणि हिंदी माध्यमात शिकणार्‍या विद्यार्थांना नाटक आणि नाट्यछटांमध्ये गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने या भाषांमध्ये स्पर्धा सुरु करण्यात आली. परिक्षक म्हणून माधुरी गुळवेलकर, अब्दुल नबी शेख, मुग्धा वडके, दीपा परांजपे यांनी काम पहिले. उज्ज्वला केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हिंदी नाट्यछटा निकाल- शिशु गट – प्रथम – नभा कुलकर्णी,
द्वितीय – आरव लाटे, उत्तेजनार्थ – अरिषा कुंभार. पहिली/दुसरी गट – उत्तेजनार्थ – विश्‍वम हरगुडे/यज्ञेश सोनगिरे. तिसरी/चौथी गट – प्रथम – अभिव्यक्ती मदने, द्वितीय – शर्वरी भोंगळे, तृतीय – सई शिरसकर, उत्तेजनार्थ – प्राची संघवी. पाचवी/सहावी गट
– प्रथम – ईश्‍वरी वडवेकर, द्वितीय – रचिता चौगुले, उत्तेजनार्थ – ईशा देवधर. सातवी/आठवी गट – प्रथम – नक्षत्रा रासकर, द्वितीय – सानिका नर्के, लेखन विभाग – पालक – शालिनी बडोलिया, शिक्षक- जीत कौर सोधी, उत्तेजनार्थ – रेश्मा चव्हाण.

इंग्रजी नाट्यछटा निकाल – लहान गट – प्रथम – अरिशा कुंभार, द्वितीय – निधी चौरे, तृतीय – अरुंधती सुरवडे – उत्तेजनार्थ – आकांक्षा रेड्डी/ अनुलेखा नम्बियार. पहिली/दुसरी गट – प्रथम – अन्वी बेलसरे, उत्तेजनार्थ – आंचल कुंभार. तिसरी/चौथी गट –
प्रथम – ईशान्या राहुरकर, द्वितीय – सान्वी भाके, पाचवी/सहावी – प्रथम – वैष्णवी गटकुळ, सातवी/आठवी – प्रथम – सानिका नरके, द्वितीय – अक्षया तनपुरे, लेखन विभाग
शिक्षक – दीपाली तनपुरे.