रावेर – दिवाळीच्या तोंडावर रावेर तहसील विभागाकडून गरीब कुटुंबाना साखर वितरी करण्यात आली आहे
आगामी दिवाळी पंधरा दिवसावर येऊन ठेवली असुन गरीब कुटुंबाच्या घरात दिवाळी निमित्त गोड पदार्थ तयार व्हावे म्हणून तहसीलदार विजय कुमार ढगे यांनी पुरवठा विभागाला सूचना देऊन ताबळतोब साखर रेशन दुकानांमध्ये वितरीत करण्यात येणार आहे तसेच या रेशन दुकानांद्वारे ही साखर तालुका भरातील दहा हजार ३५ अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मिळनार आहे रावेर तालुक्यासाठी पुरवठा विभागात जिल्हावरुन १०५ क्विंटल साखर प्राप्त झाली असल्याची माहीती तहसीलदार श्री ढगे यांनी दिली आहे