भुसावळ : दिवाळीमुळे रेल्वे गाड्यांना वाढलेली गर्दी पाहता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई येथून गोरखपूर, दानापूर व बनारस येथे जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्याने प्रवाशांची सोय होईल. मात्र, त्यातून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांना प्रवास करता येईल.
अशा धावणार विशेष गाड्या
01263 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6 नोव्हेंबरला रात्री 10 वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी 7 वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. तर 01264 विशेष गोरखपूर येथून 8 नोव्हेंबर सकाळी 8.15 वाजता सुटून दुसर्या दिवशी दुपारी 1.30 वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा येथे थांबणार आहे. 01269 विशेष एलटीटी येथून 4 नोव्हेबरला रात्री 11.05 वाजता सुटली. ही गाडी दानापूर येथे 6 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजता पोहोचेल. 01270 विशेष 6 नोव्हेंबरला पहाटे पाचला दानापूर येथून सुटून दुसर्या दिवशी दुपारी 1.15 वाजता एलटीटी येथे येईल. कल्याण, नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा येथे थांबा आहे. 01273 विशेष एलटीटी येथून 5 नोव्हेंबरला रात्री 11.05 वाजता सुटून 7 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजता दानापूरला पोहोचेल. 01274 विशेष 7 नोव्हेंबरला पहाटे पाचला दानापूर येथून सुटून दुसर्या दिवशी दुपारी 1.15 वाजता एलटीटीला येईल. या गाडीला कल्याण, नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर असे थांबे आहेत.
एलटीटी-बनारस विशेष गाडी
01279 विशेष एलटीटी येथून 6 नोव्हेंबरला सकाळी 11.15 वाजता सुटून बनारस येथे 7 नोव्हेंबरला दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. तसेच 01280 विशेष बनारस येथून 7 नोव्हेंबरला दुपारी 3.40 वाजता सुटून एलटीटीला दुसर्या दिवशी सायंकाळी 6.15 वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, ज्ञानपूर रोड येथे थांबणार आहे.