गर्दीवर मिळणार नियंत्रण ; भुसावळ विभागातील प्रवाशांना लाभ घेण्याचे आवाहन
भुसावळ- दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता त्यांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 24 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत. एलटीटी-गोरखपूर, मंडुआडीह, छत्रपती शिवाजी टर्मिनल-जम्मूतवी तसेच लखनऊ दरम्यान या गाड्या धावणार आहेत.
अशा आहेत विशेष रेल्वेगाड्या
01115 लोकमान्य तिलक टर्मिनस-गोरखपुर साप्ताहिक विशेष गाडी 3 ते 17 नोव्हेंबर तसेच 01116 साप्ताहिक विशेष गाडी 4 ते 18 नोव्हेंबर दरम्यान दर रविवारी गोरखपूरहून सुटेल. 01087 लोकमान्य तिलक टर्मिनस-मंडुआडीह साप्ताहिक विशेष गाडी 7 ते 21 नोव्हेंबर दरम्यान लोकमान्य तिलक टर्मिनसहून सुटेल तसेच 01088 साप्ताहिक विशेष गाडी 8 ते 22 नोव्हेंबर दरम्यान गुरुवारी मंडुआडीहून सुटेल तसेच (वन वे)
02171 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-जम्मूतवी एसी सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी 2 ते 16 नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटेल व 01172 जम्मूतवी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी 4 ते 18 नोव्हेंबर दरम्यान दर रविवारी सुटेल. 02019 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – लखनऊ एसी सुपरफास्ट साप्ताहिक विशेष एसी सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी 6 ते 20 नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल तसेच 02020 लखनऊ-छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस एसी सुपरफास्ट साप्ताहिक विशेष (वन वे) एसी सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी 7 ते 21 नोव्हेंबरदरम्यान लखनऊवरून सुटेल.
विशेष गाड्यांसाठी आजपासून आरक्षण
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस/लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार्या 01115, 01087, 02171 तथा 02019 साप्ताहिक विशेष गाड्यांसाठी 27 ऑक्टोबरपासून पीआरएस केंद्र तथा रेल्वेच्या संकेतस्थळावरून आरक्षण करता येणार आहे. गाड्यांमध्ये सामान्य द्वितीय श्रेणीचे डब्बे अनारक्षित असतील तसेच युटीएस अॅपद्वारा तिकीट काढता येणार आहे.