दिवाळीत रेल्वे प्रवाशांना दिलासा ; सहा विशेष गाड्यांमुळे प्रवाशांची होणार सोय

0

भुसावळ विभागातील महत्वपूर्ण स्थानकांवर गाड्यांना थांबा ; सुविधेचा लाभ घेण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ- दिवाळीत रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी पाहता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबई-मंडुदाही, पुणे-गोरखपूर व मुंबई-सांत्रागाची दरम्यान सहा विशेष गाड्या धावणार आहेत. भुसावळ विभागातील महत्वपूर्ण स्थानकांवर या गाड्यांना थांबा असून रेल्वे प्रवाशांनी अधिकृत तिकीट काढून रेल्वे गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.

अशा आहेत विशेष रेल्वे गाड्या
01055 मुंबई-मंडुदाही स्पेशल गाडी 6 रोजी सोमवारी व रात्री 12.20 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजता मंडुदाही पोहोचेल तसेच 01056 मंडुदाही-मुंबई गाडी 7 रोजी आठ वाजता सुटून मांडुआडीह सुटेल तसेच दुपारी 1.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा (केवळ 01056 अप साठी), इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपुर आणि इलाहाबाद या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 02017 पुणे-गोरखपूर सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस रविवार, 4 पुण्यावरून रात्री आठ वाजता सुटेल तर दुसरया दिवशी गोरखपूरला रात्री 2.10 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 02018 सुपरफास्ट स्पेशल गाडी मंगळवार, 6 रोजी पहाटे 5.30 वाजता गोरखपूरहून सुटेल व दुसर्‍या दिवशी 12.10 वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीला दौंड, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, बीना, झांसी, ओराई, कानपूर, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबा देण्यात आला आहे. 02103 मुंबई-सांत्रागाच्छी सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून मंगळवारी रात्री 12.20 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 9.30 सांत्रागाच्छी पोहोचेल. गाडी क्रमांक 02104 सुपरफास्ट स्पेशल मंगळवार, 6 रोजी रात्री 9.25 वाजता सांत्रागाच्छीवरून सुटून तिसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे सहा वाजता पोहोचल. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड (केवळ 02103 साठी), भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंडिया, दुर्ग, रायपूर, बिलासपुर, झारसुगुडा जे., रूरकेला, चक्रधरपूर, ताटानगर आणि खरगपूर आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

विशेष गाड्यांना आरक्षणाची सुविधा
गाडी क्रमांक 01055, 02017 आणि 02103 या गाड्यांना विशेष शुल्कावरील सर्व पीआरएस स्थानकांवर आणि 4 नोव्हेंबरपासून तसेच रेल्वे संकेत स्थळावर तिकीटांचे बुकींग करता येणार आहे. या विशेष गाड्यांमधील सामान्य द्वितीय श्रेणीचे प्रशिक्षक अनारक्षित कोच म्हणून चालतील. तिकीट यूटीएस प्रणालीद्वारे बुक करता येणार आहे.