फैजपूर व मस्कावदच्या सामाजिक संस्थांचा स्तुत्य उपक्रम
फैजपूर- दिवाळीनिमित्त अतिदुर्गम आदिवासी भागात कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून आदिवासींची दिवाळी साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम फैजपूर व मस्कावद, ता.रावेर येथील सामाजिक संस्थांनी राबविला. मेंढागड, जि.खरगोन मध्यप्रदेश येथे 31 रोजी प.पू.गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात व इतर पाड्यावर विधवा महिला, अपंग व्यक्ति व ज्यांची अतिशय गरीबीची परीस्थिती आहे अश्या चिरीया, मोहनपारा, झिरन्या या मध्यप्रदेशातील अतिदुर्गंम आदिवाशी भागात दिवाळीनिमित्त 60 कुटुंब प्रत्येक कुटुंबाला कपडे, मिठाई, जीवनावश्यक वस्तु, किराणा इत्यादी साहित्याचे वितरण प.पू.गोपाल चैतन्य महाराज, पाल यांच्या सान्निध्यात वाटप करण्यात आले.
150 कुटुंबाची जवाबदारी स्वीकारली
दिवाळीनिमित्त या कुटुंबांना एक मदत म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन निर्माण फाउंडेशन मस्कावद, श्री स्वामी समर्थ बचत गट, फैजपूर, शिवराय मित्र मंडळ, पेहेड मित्र मंडळ, श्री साई ग्रुप, श्रीराम अॅग्रो, मोरया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यंदा प्रथम या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुढील वर्षी 150 कुटुंबाची जबाबदारी वरील मित्र मंडळ स्विकारणार असून इतरांना सुद्धा सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या उपक्रमाच्या माध्यमातून दिवाळी साजरी करण्यासाठी मिळालेल्या जीवनावश्यक, किराणा व कपडे या वस्तूंमुळे या आदिवासींची दिवाळी गोळ झाली त्यामुळे या गरीब कुटुंबाच्या चेहर्यावर अतिशय वेगळाच आनंद व हास्य फुलून दिसत होते.