दिवाळीमुळे लक्झरी वाहनांचे भाव दुप्पट-तिप्पट वाढले

0

मुंबई : दिवाळीला सुट्टीनिमित्ताने गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली असल्यामुळे आता खाजगी लक्झरी वाहन चालकांनी तिकिटाच्या दरात दुप्पट-तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. नियमांप्रमाणे खाजगी लक्झरी वाहन चालकांना एसटी महामंडळाच्या बस तिकिटांच्या तुलनेने दीडपट रक्कम घेण्याचा अधिकार आहे. परंतु, आता दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढती गर्दी बघून खासगी लक्झरी वाहन चालकांनी तिकिटाचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहे. इंधन दरवाढीचे कारण देत, एसटी महामंडळाने दिवाळी सणासुधीच्या काळात १० टक्के भाडेवाढ केली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत खासगी लक्झरी वाहन चालकांनी एसटीच्या नवीन दरांच्या दुप्पट-तिप्पट भाडेवाड केली आहे.