मुंबई- दिवाळीला रात्री केवळ ८ ते १० या दोन तासातच फटाके फोडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्यास मात्र न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या निर्णयाला विरोध केला असून अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही, शिक्षा झाली तरी चालेल असे सांगत निर्णयाला आव्हान दिले आहे.
लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावर फटाके वाजवणार. फटाके आणि दिवाळी अतूट नाते आहे त्यामुळे परंपरा मोडणार नाही असे आमदार आव्हाड यांनी सांगितले.
अभ्यंगस्नाना नंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही
लक्षमी पूजन च्या मुहूर्त फटाके वाजवणार
फटाके आणि दिवाळी अतूट नाते
परिणाम भोगण्याची तयारी— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 24, 2018