भुसावळ । महिला, पुरुषांत असलेले कलाकौशल्य विकसित व्हावे म्हणून येथील दिव्यदान फाऊंडेशनतर्फे 8 ऑक्टोबर रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रांगोळी ही एक कला असून ती मांगल्याचे प्रतिक आहे. या कलेचा प्रचार, प्रसार व्हावा. अंगभूत कलाकौशल्य विकसित व्हावी म्हणून फाऊंडेशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धकांनी नावनोंदणीसाठी 23 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील दिव्यदान फाऊंडेशन येथे संपर्क साधावा. फ्री हॅड, संस्कार भारती, पोस्टर्स, ठिपक्यांची रांगोळी असे स्पर्धेचे तीन विषय आहेत. प्रत्येक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावणार्या स्पर्धकाला स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या अध्यक्षा रागिणी परदेशी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी यांनी केले आहे.