दिव्यांगदेखिल साहित्य निर्मिती करु शकतात

0

जळगाव । डोळस व्यक्तीच चांगले साहित्य निर्माण करू शकतो असे नाही. शरीराचा एखादी अवयव निमामी झाला म्हणून काय झाले. अंध अपंग व्यक्ती देखिल उत्त्म साहित्याची निर्मीती करू शकतो असे प्रतिपादन समाजोत्थान साहित्य सम्मेलनाचे नवे अध्यक्ष काशिनाथ महाजन यांनी केले. मु.जे.महाविद्यालयात शनिवारी आयोजीत दोन दिवसीय अंध अपंगांचे राज्यस्तरीय दुसरे साहित्य संमेलना प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाला शहरातील मान्यवरांची होती उपस्थिती
मु.जे महाविद्यालयातील जुन्या सभागृहात या सम्मेलनाचे सकाळी 10.30 वाजता आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे, केसीईचे अध्यक्ष नितीन फालक, संमेलनाध्यक्ष काशिनाथ महाजन, प्राचार्य डॉ.यु.डी.कुलकर्णी, माजी संमेलनाध्यक्ष त्र्यंबक माकासरे, पिपिल्स बंँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, दिपस्तंभचे यर्जुवेंद्र महाजन यांची उपस्थिती होती. साजिदा शेख मेश्राम, रेवानंद मेश्राम, प्रभा मेश्राम आदींची उपस्थिती होती. संमेलनात काशिनाथ महाजन यांनी पुढे बोलतांना सांगीतले की, खांंन्देश हा बहिणाबाईंच्या कवितांनी प्रतिष्ठीत आहे. मला आजही बहिणाबाईंचा भाऊ म्हणून संबोधले जाते. आज मला या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभले यामुळे मला खुप आनंद होत आहे. मी वयाच्या दहाव्या वर्षापासुन कवितांना सुरूवात केली होती.

महाजन यांनी व्यक्त केले विचार
त्रिवार वंदन माझे मधुकरराव चौधरींना दगडामधले रत्न शोधले त्या रत्नपारखींना, माझी नजर कमी झाली यामुळे लिहीने वाचने बंद झाले. कवीतांनी दिला आधार पुढे जाण्याचा निर्धार, यामुळे मला अंध असल्याची कधीच जाणीव होत नाही़ मावळते अध्यक्ष त्रंबक मकासरे यांच्या हस्ते नवीन अध्यक्ष पदाचे सुत्र मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ठ आहे़ माणसाची बुध्दी ही विचारशील, संवेदनशील व लेखी विचारांवर असते यामुळे कुणीही सहच वाचु शकते.