पाळधी । दिव्यांगांना सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध असून त्यांचे खर्या अर्थाने पुर्नवसन करण्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे झालेल्या दिव्यांगांना साहित्य वाटप प्रसंगी केले. यापुर्वी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबीरामध्ये धरणगाव तालुक्यातील 57 पात्र लाभार्थ्यांना 18 सायकल, 3 व्हील चेअर, 33 कुबड्या, 3 कर्णयंत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, जळगाव तालुका प्रमुख नाना सोनवणे, धरणगाव पं.स.चे उपसभापती प्रेमराज पाटील, सचिन पवार, पं.स.सदस्य मुकुंदराव नन्नवरे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुकुंद गोसावी यांनी केले. यशस्वीतेसाठी युवासेनेचे शहर प्रमुख प्रमोद परदेशी, आबा महाजन, दिपक श्रीखंडे, अनिल महाजन, गोकुळ पाटील, भरत पाटील आदींनी परिश्रम घेतले.