जळगाव । दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनाचे काम करणार्या जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांची एकत्रित बैठक कांताई नेंत्रालय संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यात विखुरलेल्या विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख पहिल्यांदाच एकत्र आले. या संस्थांच्या प्रमुख प्रतिनिधींनी आपल्या सामाजिक संस्थेबाबत आणि चालणार्या सामाजिक उपक्रमाबाबत उपस्थितांना माहिती दिली. या संस्थांना एकमेकांशी जोडणे व कामाचा आवाका वाढावा यासाठी उपस्थित सर्व संस्थांची सूची तयार करून ती लगेच वितरीत करण्यात आली.
कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
दिव्यांग व्यक्तींना स्वयंसेवी बनवून समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने एकमेकांच्या सहकार्याने काही वेगळे कार्य उभे करून या व्यक्तींना मदत करू शकतो या प्रमुख उद्देशाने भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि पुणे अंधजन मंडळ यांच्या कांताई नेत्रालयाने या बैठकीसाठी पुढाकार घेतला.बीएम या मुळ जर्मन संस्थेच्या संकल्पनेवर आधारित डिसअॅबिलिटी इनक्लझिव्हीटी ही विचारधारा सर्वत्र रूजविण्याचा हा एक प्रयत्न होता. नव्याने झालेल्या कायद्याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय निमशासकीय सार्वजनिक इमारती देखील याच प्रेरणेतून विकसित करण्यात येतील. जेणे करून दिव्यांगांना कोणाच्याही मदतीविना सर्व कामकाज करणे सुकर होईल असे कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.या प्रसंगी डॉ. अनिता राठोड, अपंग पुनर्वसन केंद्राचे गणेशकर, राजेश यावलकर, सामाजिक कार्यकर्ते नरेश खंडेलवाल यांची उपस्थिती होती.