फैजपूर- फैजपूर पालिकेंतर्गत दिव्यांगासाठी असलेल्या कल्याणकारी योजना राबविण्यासह पालिका अंदाजपत्रकात दिव्यांगांसाठी असलेल्या तीन टक्के राखीव निधी मिळावा या मागणीसाठी बुधवारी फैजपूर शहरातील दिव्यांगांनी मुख्याधिकार्यांना निवेदन दिले. फैजपूर शहरातील दिव्यांगांनी फैजपूर पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना 25 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिका अंदाजपत्रकात दिव्यांगांसाठी तीन टक्के निधी असतो परंतु पालिकेंतर्गत या निधीचा वापर दिव्यांगांसाठी केला गेला नाही तर हा निधी शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग बांधवांना मिळावा व दिव्यांगांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात व पालिका अंदाजपत्रकात तीन टक्के राखीव निधीतून प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना मिळावा किंवा त्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनावर यांच्या स्वाक्षर्या
निवेदनावर नितीन काशीनाथ महाजन, शेख एहसान शेख, ईसा कुरेशी, रीयाज शेख सादिक, शेख अशपाक शेख मुश्ताक, नाना लक्ष्मण मोची, शेख शरीफ शेख हनीफ मोमीन, ललित प्रभाकर वाघूळदे, अमीना बी.कादीर तांबट, शेख युनूस शेख युसूफ, विनोद नामदेव बिर्हाडे, दानीश शेख चिरागुद्दीन, शेख अन्सार शेख ईमाम, आसीफ शेख नुरुद्दीन, शेख युसूफ शेख रहीम आदींच्या स्वाक्षर्या आहेत. दिव्यांग बांधव आल्यानंतर मुख्याधिकारी किशोर चव्हाण स्वतः निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर आले.