एरंडोल । तालुक्यातील दिव्यांग कर्मचार्यांची बैठक पद्मालय शाळेत संपन्न झाली. संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रविंद्र पाटील यांनी अपंग कर्मचार्यांना येणार्या अडचणी, होणारा त्रास याबाबत माहिती दिली. अपंग कर्मचारी म्हणून शासनाकडून मिळणार्या सुविधा, वाहन भत्ता, अपंग कर्मचार्यांसाठी शासनाचे निर्णय याविषयी मार्गदर्शन केले. अपंग कर्मचार्यांनी आत्मविश्वासाने कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
रंग चौधरी, विनोद पाटील, सतिश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश महाजन यांनी सूत्रसंचालन तर अनिल पाटील यांनी आभार मानले. बैठकीस रामभाऊ ठाकूर, अनिल पाटील, विनोद पाटील, संदीप पाटील, इक्बाल शेख, पांडुरंग चौधरी, बापू पाटील, सतिश पाटील यांच्यासह दिव्यांग कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.