भुसावळ : उपनगरीय गाड्यांमध्ये दिव्यांग जणासाठी राखीव असलेल्या डब्ब्यातून प्रवास करणार्या अनधिकृत प्रवाशांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने 2 ते 16 ऑगस्टदरम्यान विशेष मोहिम दादर स्टेशनवर राबवली. अनधिकृत प्रवास करणार्या एकूण 57 व्यक्तींना पकडण्यात आले, रेल्वे कायद्याच्या कलम 155 अन्वये त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 2 ते 9 ऑगस्ट 2021 या कालावधीत 30 व्यक्तींना तर 10 ते 16 ऑगस्ट 2021 या कालावधीत 27 व्यक्तींना पकडण्यात आले. रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी दिव्यांगजनासाठी आरक्षित डब्यात प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.