दिव्यांग जलतरणपटू कॅमिला पटनायकचा गौरव

0

आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने दिव्यांग जलतरणपटू कॅमिला पटनायक हिचा सन्मान स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्या हस्ते करण्यात आला. कॅमिलाने ‘फ्लोरेन्स’ इटाली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध ठिकाणी झालेल्या विविध जलतरण स्पर्धेमध्ये कॅमिला पटनायक या दिव्यांग जलतरणपटूने सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदके मिळविली आहेत. त्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास उर्फ बाबा बारणे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेडगे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसदस्य लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, हर्षल ढोरे, उत्तम केंदळे, अमित गावडे, मोरेश्‍वर भोंडवे, राजू मिसाळ यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

अनेक पुरस्कार पटकविले
वयाच्या तीन वर्षापासून कॅमिला पटनायक हिने पोहण्याचा सराव सुरु केला आहे. तिने टाटा मोटर्स कंपनीचे दहा हजार रुपयाचे पारितोषिक मिळविले आहे. नुकतेच गांधीनगर गुजरात येथे झालेल्या विशेष ऑलिम्पीक जलतरण स्पर्धेमध्ये तिने सुवर्ण पदक मिळेविले आहे. 50 मीटर फ्रि-स्टाईल राष्ट्रीय पॅरॉऑलिम्पीक जलतरण स्पर्धेमध्ये तिने सुवर्ण पदक मिळविले आहे.