जळगाव । दिदिव्यांगांची काठी म्हणून सदैव कार्य करणार असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी व पुर्नवसनासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे झालेल्या दिव्यंग पुनर्वसन भव्य शिबिरा प्रसंगी व्यक्त केले. या शिबिरात एकूण 445 दिव्यांग व्यक्तिची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाब वाघ हे होते. सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वतीने जळगाव ग्रामीण मतदार संघात धरनगाव व जळगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांकरीता सहाय्यक साहित्य व कृत्रिम अवयव मोफत उपलब्ध करण्यासाठी धरणगाव येथे 29 रोजी ग्रामीण रुग्णालयात तर 30 जून रोजी जळगाव येथे सरदार वल्लभ भाई पटेल सभागृहात शिबिराचे आयोजन केले होते.
जळगावात 205 जणांना साहित्य
सदर शिबिरात जयपुर फुट व क्यालिपर्स करिता मुबंई येथील विख्यात तंत्रदन्य शेरशिनग राठोड उपस्थित होते. शिबिरा अंतर्गत कृत्रिम हात तीन, चाकि सायकल, व्हील चिअर, कुबड्या, क्यालिपर व जयपुर फुट साहित्या साठी मोफत तपासणी करण्यात आली. धरणगाव येथे झालेल्या शिबिरात 240 व्यक्तिंची तर जळगाव येथे 205 अशा 445 दिव्यानग व्यक्तिंची तपासणी करण्यात आली. पुढील महिन्यात सदर दिव्यानग बांधवाना साहित्य वाटप करण्यात येणार आहे़
घरोघरी सर्वे: जळगाव व धरणगाव तालुक्यातील प्रत्तेक गावात आरोग्य सेवक,सेविका व आशा वर्कर यांच्या मार्फत घरोघरी दिव्यांगांचा सर्वे करण्यात आला होता. सदर शिबिरात एस़ पी़ गनेशकर, डॉ.संजय सोनवणे, डॉ.संजय चव्हाण, ग्रामीण रुगणालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ गिरीश चौधरी, डॉ.शिवराय पाटील, डॉ़.सागर, डॉ़ इरफान तडवी़ डॉ.वानखेडे, डॉ़ सचिन आहिरे, डॉ.विजय कुरकुरे यांचा शिबिरात सहभाग होता. शिबिराला मुक्ति फाउंडेशन चे सहकार्य लाभले.
यांची होती उपस्थिती
तालुका प्रमुख नाना सोनवणे, उपसभापती पंचायत समिती सदस्य नंदू पाटील, डॉ.कमलाकर पाटील, तुषार महाजन, प्रवीण पाटील, जना अप्पा पाटील, धोंडु सपकाळे, राजेंद्र महाजन, संदीप महाजन, विजय भावे़, वासुदेव चौधरी़, अजय चव्हाण, किरण अग्निहोत्री, भानुदास विसावे, मनोज सपकाळे, शोएब शेख, आबा महाजन यांच्या सह शिवसेना पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ति फाउंडेशनचे मुकुंद गोसावी व रवी कंखरे यांनी केले. प्रस्ताविक माजी जि.प. सदस्य विश्वनाथ पाटील यांनी तर आभार प्रताप पाटील यांनी केले.