जळगाव । मुक्ती फाऊंडेशनतर्फे स्थानिय विविध संस्थांच्या सहकार्याने 31 डिसेंबर रोजी बालगंधर्व सभागृह येथे दिव्यांग पुनर्वसनार्थ नुतन वर्षाच्या पुर्वसंध्येला अस्थिव्यंग, कर्ण(मुक) बधीर, प्रज्ञाचक्षु दिव्यांगांसाठी अपंग विकास मंडळ, संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रसेवा फाऊंडेशन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, कांताई नेत्रालय, नर्मदा फाऊंडेशन, साई कॉम्प्युटर्स, शिवमुद्रा ग्राफीक्स आदींचे सहकार्य लाभले आहे.
जनजागृतीपर कार्यक्रम राबविणार
शासकीय नोकरी दुरापास्त झाल्याने काही उद्योग, व्यवसाय आपण करु शकतो, खाजगी ज्या कंपनीत दिव्यांग काम करु शकतात, अशा ठिकाणी रोजगार मिळावे, बसल्या जागी शहरात मोठा दिव्यांग व्यवसाय होऊ शकतो का? आदी विषयांवर यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन घेणार असून यावेळी यजुर्वेंद्र महाजन यांचा गौरव करण्यात येईल. सोबतच रस्ता सुरक्षा अभियान, अवयवदान, रक्तदान, व्यसनमुक्ती, शाकाहार-सदाचार, वृक्षारोपण, जलसंवर्धन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छता अभियान आदी जनजागृतीपर कार्यक्रम राबविणार असून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी जे सदृढ सहभागी होऊन दिव्यांगांसोबत विवाह करु शकतात, अशांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. विविध स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रीत सहभागातून सर्वसमावेशक अशा उपक्रमासाठी दिव्यांग बंधुंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून इच्छूकांनी नावनोंदणी करावी.