दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवा

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य सुविधा नसल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर दिव्यांग विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश करताना अथवा नोटीस बोर्डावरील सूचना अवगत करताना येणार्‍या अडचणी दूर करा आणि त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.

उच्च न्यायालयाने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाकडूनही सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या विद्यार्थ्यांसाठी काहीच सोय केली जात नसल्याचे दिसून येत आहे.