तळोदा । सर्वत्र वृक्ष लागवडीसाठी शासन स्तरावर प्रयत्न होत असले तरी अनेकदा त्यात फोटोशेशनसाठी रोप लावण्याचा दिखाऊपणा केला जातो. मात्र दोघे हातांनी अपंग असलेला शिक्षक ज्यावेळी स्वतः वृक्षलागवड करतो त्यावेळी निश्चितपणे शारीरिकदृष्टीने तंदुरुस्त असणार्या माणसाने वृक्ष लागवडबद्दल जागरूक असणं आवश्यक आहे अशी भावना व्यक्त होत आहे. विनोद भिकनराव पगार विराणे ता.मालेगाव जि.नाशिक येथील मूळ निवासी असून तळोदा येथील पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत माध्यमिक शिक्षक आहेत. आपल्या अपंगत्वार मात करत शिक्षक झालेल्या या दिव्यांग शिक्षकाने वृक्षलागवडीसाठी दाखवलेली जिद्द निश्चित प्रेरणादायी आहे.