विविध मागण्यांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरणार; पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव- दिव्यांगांना शिवनेरी बसमध्ये 75 टक्के आरक्षण हवे, उत्पनाच्या दाखल्याची अट रद्द करावी, पेन्शन 3-5 हजारापर्यंत द्यावे, अन्यथा आमदारांचे पेंशन बंद करा, या विविध मागण्या करीत, केंद्र, राज्यसरकार तसेच रेल्वे प्रशासनाविरोधात राज्यभर तीन टप्प्यात संताप मोर्चा काढण्यात येणार असून याची सुरूवात जळगावातील महामोर्चाने होईल, अशी माहिती दिव्यांग सेनेतर्फे आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. दिव्यांग सेनेचे जिल्हा अधिवेशन आज जळगावात आयोजित करण्यात आले होते, यात मोर्चासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे अध्यक्ष प्रसाद साळी यांनी सांगितले.
……………………………………….
आमदार, खासदार आम्ही ठरविणार!
देशात दिव्यांगासाठी काम करणार्या सात संस्था आहेत, मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे या संस्थांसंदर्भात स्थाकिन पातळीवरील दिव्यांगाना कसलीही माहिती नाही, यासंदर्भात कुठेच माहिती कक्ष नाहीत. आली. राज्यातील 48 खासदारांनी दिव्यांगांकडे दुर्लक्ष केले असून या साडेचार वर्षात त्यांनी दिव्यांगासाठी काय केले हे सांगावे, असा सवाल दिव्यांग सेनेतर्फे आयोजित परिषदेत अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी उपस्थित केला. आगामी आमदार खासदार आता दिव्यांग ठरवतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
…………………………………….
पालकमंत्र्यांच्या समिती आहेत कुठे?
सत्ताधार्यांना केवळ 3 डिसेंबर व निवडणुकांमध्ये दिव्यांगांची आठवण येते. मोदी सरकारने दिव्यांग शब्द जेवढ्या झटपट आणला तेवढ्या झटपट मागण्या का मान्य होत नाही. जळगाव महापालिकेत सर्व निधी पडून आहे. ठाणे सोडले तर पालकमंत्र्यांची दिव्यांग समिती कुठेच नाही, या उदासीनतेमुळे दिव्यांग योजनांपासून वंचित राहत आहेत. सत्ताधार्यांना दिव्यांग समजलाच नाही, त्यामुळे आज दिव्यांगांना रस्त्यावर उतरावे, लागत असल्याचेही साळवी म्हणाले. यावेळी दिव्यांग सेनेचे सरचिटणीस रोहन सातार्डेकर, जळगाव जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, उपाध्यक्ष भरत जाधव, शहराध्यक्ष शेख शकील, महाराष्ट्र सचिव सोमना माळी, जिल्हा सहसचिव ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा सचिव हितेश तायडे, कार्याध्यक्ष प्रदिप चव्हाण, संचालक आदिल शहा, मुकबधीर शहराध्यक्ष भिमराव म्हस्के, नशिराबाद अध्यक्ष रोशन शहा यासह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते या परिषदेला उपस्थित होते.
Prev Post