महिलांवरील अत्याचार रोखणार: ‘दिशा’ची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आंध्रप्रदेश दौऱ्यावर !

0

मुंबई: महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्याची हालचाली राज्य सरकारने सुरु केली आहे. आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा केला असून त्याद्वारे महिलांवरील अन्याय रोखण्यात यश मिळविले आहे. या कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शहर गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि ग्रामीण गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई हे आंध्रप्रदेश दौऱ्यावर आहेत.

आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या कायद्याचा अभ्यास मंत्री करणार असून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्याबाबतचा विचार होणार आहे.