जळगाव । दिशा स्पर्धा परिक्षा केंद्रातर्फे बुधवारी 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता बँकींग क्षेत्रात करीअर करणार्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलसमोरील कोहिनूर टेक्निकलच्या वरील हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. यावेळी कार्यशाळेत प्रा. उमेश सुर्यवंशी, प्रा. विशाल शिरसाठ, प्रा. तुषार पाटील या मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. कार्यशाळेत गणित, बुध्दीमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्रजी व्याकरण, कॉम्प्युटर तसेच चालु घडामोडी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रात भविष्यात मोठी संधी असून बँक क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. उपस्थितीचे आवाहन दिशा स्पर्धा परिक्षा केंद्राचे संचालक प्रा. वासुदेव पाटील यांनी केले
आहे.