बेटावद। येथील पांझरा नदीच्या पुलाजवळ पेट्रोल पंपाजवळ राज्य मार्ग क्र. 6 वर मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी वाहनधारकांमधून करण्यात येत आहे. बेटावदकडून अमळनेर जळगावकडे राज्य मार्ग क्र. 6 हा गेलेला आहे. पांझरा नदीच्या पुलाजवळील पेट्रोलपंपाजवळ तीन रस्ते गेलेले आहेत. बेटावदकडून अमळनेर जळगावकडे व दुसरा धुळ्याकडे रस्ता आहे.
मात्र, या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने जळगावकडे जाणारी वाहने सरळ धळ्याकडे जातात. तर धुळ्याकडे जाणारी वाहने अमळनेरकडे जातात. वाहनधारक गावापर्यंत पोहचल्यावर आपण रस्ता चुकलो असल्याचे त्यांचे लक्षात येते. यामुळे त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागते. वाहनधारकांचा होणारा नाहक त्रास वाचविण्यासाठी शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पेट्रोल पंपाजवळील हाळ जवळ मार्गदर्शक फलक लावावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.