दिशाभूल करणार्‍यांपासून सावध राहण्याचे आवाहन

0

जळगाव । मनपा ने पंतप्रधान आवास अंतर्गत गरीबांना, निराधारांना, बेघरांना, भाड्याचे घरात राहणार्‍यांना कायमस्वरूपी स्वतःचे घर निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. पण ते दुसर्‍याच्या खांद्यावर बंदुक ठेवून जबाबदारी टाळण्याचे संकेत देत आहेत. सर्वेक्षणाचे गोंडस नावाखाली मनपा जळगाव ने अकोला स्थित भुतडा कंपनीस देवून जळगावकर गरीबांना मोठा धक्काच दिला आहे. नाशिक, धुळे व अन्य मनपामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे कोणीही सर्वेक्षणाचे काम करीत नाही. नागरिकांना प्रत्यक्ष एक अर्ज देवून पोहच मिळत आहे व आपला हक्काचा मार्ग दिसत आहे. पण जळगाव येथे झोपडपट्टीच्या नावाने सर्वेक्षण करून इतरांना हक्कापासून वंचित ठेवण्याचा जो प्रकार चालु आहे. तो गंभीर स्वरूपाचा आहे.

अमृत योजनेला केंद्र सरकारची जळगांवकरांसाठी मंजुरी असतांना त्याचे मात्र तीन चे तेरा वाजलेले आहेत. त्याचे पडसाद सर्वदुर उमटलेले आहे. घर योजनेशी जर संबंध तर मात्र चार ते चौदा होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता तरी जागृत कुटुंबानी आपले हक्काचे घर घेण्यासाठी तयारीत असणे व संघर्ष करणे आवश्यक आहे. सर्वेक्षण करण्याचे निर्देश केंद्र सरकार का राज्य सरकार जळगाव मनपाला दिले आहे. याचा ही जाहीर खुलासा होणे गरजेचे आहे. यासाठी मानवी अन्याय निवारण केंद्राचे प्रमुख उमाकांत का वाणी यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. दिशाभूल व फसवणूक करणार्‍या पासून सावध सावधनतेचा इशारा ही देण्यात आलेला आहे.