सरळ,सोप्या भाषेत स्पर्धा परीक्षा याबद्दल माहिती उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी येऊन भेटतात.त्यांच्या प्रश्नाचे व परीक्षेच्या असलेल्या अडचणी,मनातील परीक्षेबद्दलची भीती,न्यूनगंड व स्पर्धेची आव्हाने यांना त्याने प्रामाणिक मेहनत,व योग्य मार्गदर्शन त्याला मिळावे यासाठी 20 जून 2016 ला दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना झाली.सूरवातीला पहिल्या वर्षात दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातून 62 विद्यार्थी वर्ग 1 ,2,3,या श्रेणीच्या पदांवर नियुक्त झाले.या यशाने आमच्या प्रामाणिक व योग्य मार्गदर्शनाला अधिक बळ आले,त्यातून आम्ही प्रशासकीय अधिकारी फक्त घडवायचे नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास साधायचा,त्यांना समाजाप्रती सजग व समाजाप्रती कर्तव्याची जाणीव निर्माण करून देत एक कर्तव्यदक्ष,सक्षम अधिकारी घडवायचा हा निश्चय केला.सध्या दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात युपीएससी,एमपीएससी,पीएसआय,एसटीआय,बँकिंग,तलाठी,पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण,शिक्षक पात्रता परीक्षा असे विविध कोर्सेस चालवले जात आहेत. त्यासोबत तज्ञ मार्गदर्शक याकरिता दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात उपलब्ध आहेत.परीक्षेआधी टेस्ट सिरीजच्या माध्यमातून चुकांचे निरसन करून देणे व पुणे ,मुंबई ,औरंगाबाद येथील तज्ञाचे मार्गदर्शन विविध कार्यशाळांचे आयोजन करून दिले जाते. इथे आलेल्या दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थीच्या गुणात्मक पैलुना आकार देण्यासाठी व सकारात्मक बाजूंच्या विकासासाठी केंद्र आवश्यक ते सारे प्रयत्न करत असते.विद्यार्थ्याला अभ्यासाचे नियोजन कसे करायचे.आठवडा,महिना,वर्ष योग्य नियोजन जेणेकरून प्रत्येक विषयाला योग्य न्याय देवून यशस्वी होण्यासाठी कसा अभ्यास करायचा यासोबत प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन शिकावले जाते.भावी अधिकारी व सुजन नागरिक घडवण्यासाठी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन केले जाते.स्पर्धा परीक्षा ही तुमच्या अथक मेहनत व प्रयत्न यांची शिदोरी असते त्याकरिता विद्यार्थीने कार्यशील राहायला पाहिजे.विद्यार्थी हा सतत धडपड व प्रश्न विचारणा करणारा व त्याला प्रश्न पडले पाहिजे.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अपयश म्हणजे निराशा असा संबंध नेहमी येतोपण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे विसरता कामा नये.सतत सकारात्मक विचार करा,भीती मनात बाळगू नका.संयम ठेवा यश आपली परीक्षा घेत असते त्याकरिता प्रामाणिक प्रयत्न व अभ्यासाची योग्य दिशा याकरिता दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र आपली मदतनीस म्हणून सोबत असेल त्यामुळे विद्यार्थीच्या अभ्यासाचे नियोजन व सातत्य याची आम्ही काळजी घेत असतो.याकरिता तज्ञ मार्गदर्शक विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्याच्या मदतीला येत असतात.दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र इथे विद्यार्थ्याना आपल्यातील सुप्त गुणांचा व व्याप्त उर्जेबद्दल माहिती करून दिली जाते.कारण व्यक्तीत सुप्त शक्ती ,उर्जा वास करत असते.आजचे विचार हे उद्याचे स्वप्न भविष्यात प्रत्येक्षात आकाराला आणू शकतात.फक्त तुम्ही प्रयत्न करा,त्यात सातत्य ,परिश्रम घेण्याकामी दक्ष राहिले पाहिजे.दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातून आपल्यासारखीच परिश्रम व सातत्याने अभ्यास करणारे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.जी तुमचे मित्र,नातेवाईक असतील.उदा.पीएसआय झालेले समाधान सुरवाडे,कृष्णा पाटील,सागर पाटील,पंकज सपकाळे,दीपक मोहिते,सुमेध मेढे,प्रल्हाद बंजारा आदी ही नुसती नवे नाहीत तर यशस्वी झालेल्या दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राची ओळख आहे.जर तुम्ही सातत्य ,परिश्रम घेण्यास तयार असाल तर आम्ही आपली वाट पाहत आहोत .आपल्यातील सक्षम अधिकारी घडवण्यासाठी,तर मग निर्णय पक्का करा आम्ही आपले योग्य दिशा मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत.
आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
वासुदेव पाटील
मो. नं. 9420940328