मुंबई : दिशा पटानी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती बरेच फोटो पोस्ट करत असते आणि अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. यावेळी दिशाने मात्र ट्रोलर्सचं तोंडच बंद केलं आहे.
दिशाने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत तिचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तिने लेहंगा आणि दुपट्टासोबत स्पोर्ट्स ब्रा घातल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यात सुरुवात केली. ‘भारतीय संस्कृतीचा अनादर करू नकोस’, ‘भारतीय कपड्यांच्या साधेपणाला नष्ट करू नकोस,’ असे बरेच कमेंट्स तिच्या फोटोवर येऊ लागले.
ट्रोलर्सना उत्तर देत दिशाने थेट फोटोवरील कमेंट हा पर्याय डिसेबल केला. जेणेकरून फॉलोअर्स तिचा हा फोटो तर पाहू शकतील, त्याला लाईकसुद्धा करू शकतील पण त्यावर प्रतिक्रिया देऊ शकणार नाहीत. अनेकांनी तिच्यावर टीका जरी केली असली तरी त्या फोटोला मिळालेल्या लाईक्सचा आकडासुद्धा मोठा आहे.