भुसावळ। उत्कर्ष कलाविष्कार आयोजित स्व.नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्यमहोत्सव 2017 चे उद्घाटन 2 जुन रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दिशा पिंकी शेख या बहुपेडी तृतीयपंथीय कवयित्री यांच्या हस्ते होणार आहे. दिशा शेख यांनी ‘आम्ही का तिसरे’या मराठी चित्रपटात काम केल असून 2013 ला महाराष्ट्र राज्य मराठी एकांकीका स्पधेसाठी ‘मरन जगताना’ ही एकांकीका लिहिली आहे. तसेच सबका इंटरनेट नावाने मी समुदायातील नेट वापरासंबंधी शॉर्ट फिल्म केली आहे. मनोमीलन बहुद्देशीय सामाजिक संस्था, नाशिक इथे एचआयव्ही आणि समुदायाच्या प्रश्नावर काम करणार्या पेहचान प्रकल्पात आउटरीच वर्कर म्हणून काम पाहिले आहे. तृतीयपंथी सामाजिक संस्था, श्रीरामपुर या संस्थेच्या सचिवपदी त्या कार्य करीत आहे.
‘बैल मेलाय’ नाटक रसिकांसाठी ठरणार मेजवानी
तृतीयपंथीय लोकांच्या अनेक समस्या असून बेरोजगारी, अपमानास्पद वागणूक, शारीरिक शोषण, शारीरिक अत्याचार या सर्व प्रश्नांना घेवून दिशा शेख यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. आपल्या वैचारिक मांडणीतून आणि अस्सल जीवनानुभवातून तसेच काही तृतीयपंथीय लोकांकडून होणार्या बीभत्स वर्तनावर, त्यांच्या भडकपणे जगण्यावर त्या मुलाखतीतून व्यक्त होणार आहे. हि मुलाखत रसिकांना नक्कीच अंतर्मुख करणार आहे. खान्देशातील ज्येष्ठ रंगभिडू शंभू पाटील त्यांची मुलाखत घेणार आहेत. याच दिवशी आविष्कार, मुंबई या प्रायोगिक नाटकांसाठी प्रतिष्ठेच्या संस्थेची निर्मिती असलेले ’बैल मेलाय’ हे नाटक सादर होणार आहे. युगंधर देशपांडे लिखित आणि हे बंध रेशीमाचे फेम ललित प्रभाकर यांनी ’बैल मेलाय’चे दिग्दर्शन केलंय झी गौरव नामांकने 2017 सर्वोत्कृष्ट अभिनेता -विकास पाटील, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -आरती वडगबाळकर, मटा सन्मान नामांकने 2017, सर्वोत्कृष्ट नाटक -बैल मेलाय -अविष्कार, मुंबई, सर्वोत्कृष्ट लेखक – बैल मेलाय अशी नामांकने प्राप्त नाटक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. या नाटकातील मुख्य पात्र किशोर आणि संजीवनी आहेत. ते दोन्ही अभियंते आहेत आणि मूलतः लहान शहरातील आहेत. त्या दोघांना मॉर्डन व्हायचे आहे. पण मॉर्डन म्हणजे काय? या भोवती सर्व कथानक फिरते. आणि त्याचा शेवटही होतो. त्यांचे शेजारी त्यांना त्यांच्या आधुनिक बनण्याच्या विरोधात आहे. तेव्हढ्यात एक अनोळखी व्यक्ती येऊन त्या जोडप्याला भविष्याबद्दल सांगते. पगारवाढ, नोकर्यातील पदोन्नती, मोठे घर, दारु व्यसन, विवाहबाह्य संबंध, संजीवनी गरोदर राहणे, भूकंप, सुनामी! कुटुंबांचे दावे, ग्रामीण भारतातील पाणी-वीज संकटे आणि मॉल, सिनेमागृह आणि ती अनोळखी व्यक्ती सतत म्हणत आहे की, तुमच्या घरात कुठेतरी बुडलेलले मृतदेह आहेत. सर्व कारणांमुळे सतत भय, तणाव, असुरक्षितता, वासना दुखावणारा, अहंकार, राग आणि शेवटी अनागोंदी आहे! आणि अचानक एक खून होतो. पुढे काय होते ते पाहण्यासाठी नाटक पाहवे लागेल.