दिशा महाकार्यशाळेस अभूतपूर्व प्रतिसाद

0

जळगाव। केंद्रीय सेवा आयोग , राज्यसेवा , बैंक किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांमध्ये संयम असणे महत्वाचे आहे. या परीक्षांमधील स्पर्धा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी आधी स्वताचे आकलन करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पुणे येथील प्रा.संदीप येवले यांनी केले.

जम्मू काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबई येथील प्रा किरण पाटील यांनी विद्द्यार्थ्यांना तलाठी ,एमपीएससी ,पोलीस भरती परीक्षेत येणारया गणित व् बुद्धिमत्ता विषयक मार्गदर्शन केले। चुकीच्या धारणा डोक्यातून काढून टाकून परीक्षांसाठी लागणारी तयारी सर्वस्तरांतून करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी दिशाचे संचालक प्रा वासुदेव पाटिल यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पालकच विद्यार्थ्यांमध्ये विनाकारण अभ्यासाविषयी भीती निर्माण करण्याचे काम करत असतात. त्यामुळे विद्यार्थी नाहक घाबरून जाण्याची अधिक शक्यता असते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना संकल्पना स्पष्ट करून घेणे अत्यावश्यक असल्याचे वासुदेव पाटील यांनी सांगितले. दोन दिवशीय महाकार्यशाळेत विद्यार्थ्यांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाचे संचालन प्रा कपिलदेव कोळी यांनी केले. या वेळी प्रा मदन बनसोडे , प्रा डॉ अविंत पाटिल , प्रा हेमंत साळुंके , प्रा डॉ दीपक पाटील , प्रा तुषारपाटील , प्रा ललित विसपुते , प्रा रविंद्र टोंगळे , प्रा विशाल जाधव उपस्थीत होते.