‘दिशा सामाजिक न्यायाची’ माहितीपटाचे प्रसारण आज

0

नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेने व जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबारमार्फत सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या जिल्ह्यातील यशकथांवर आधारित ‘दिशा सामाजिक न्यायाची’ हा माहितीपट गुरुवार 1 जून रोजी रात्री 8.30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारीत करण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय विभगामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माहितीपटाची संकल्पना व संशोधन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांची आहे. या माहितीपटासाठी संशोधन सहाय्य अर्चना देशमुख, दिनेश चौरे, बंडू चौरे यांनी केले आहे. या माहितीपटाचे चित्रीकरण व लेखन मिलिंद पाटील यांनी केले आहे. या माहितीपटासाठी समन्वयक म्हणून सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी काम पाहिले आहे.