दिशा सालियन मृत्यूचे आमच्याकडे पुरावे; नितेश राणेंचा गंभीर आरोप

0

मुंबई: काल झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश, नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. राजकीय हेतून राणे पिता-पुत्रांकडून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राणे यांचे नाव न घेता “एक बेडूक आणि त्याचे दोन मुले बेडूक उड्या मारत आहेत” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. याला आता आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूबाबतचा पुरावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे नष्ट करत आहे, मात्र आमच्याकडे याचा पुरावा आहे असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर विरोधकांकडून शिवसेनेवर आरोप केले जात आहे. जाहीरपणे नाव घेतले जात नसले तरी अप्रत्यक्षरित्या मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात आहे.