जळगाव । प्रा.वासुदेव पाटील संचलित दिशा स्पर्धा परिक्षा केंद्रातर्फे बॅकींग व युपीएससी परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बॅकींग व युपीएससी परिक्षेसाठी तयारी कशी करावी, याबाबत सखोल मार्गदर्शन तज्ञांनाकडून करण्यात आले. कार्यशाळा ही परिक्षा केंद्रातच आयोजित करण्यात आली होती. प्रा. उमेश सुर्यवंशी, प्रा. प्रदिप येवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धा परिक्षांना कसे सामारे जावे यावर मार्गदर्शन करत त्यांना अभ्यासाच्या टिप्स दिल्या. नियोजनबध्द अभ्यास केल्यास स्पर्धा परिक्षांमध्ये यश निश्चित मिळते व बॅकींग क्षेत्रात यश मिळविण्यासाठी गणित विषयाला महत्व देवून अभ्यास करावा, असा सल्ला यावेळी मान्यवरांनी दिला कार्यशाळेत प्रा. वासुदेव पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. कपिलदेव कोळी, प्रा.मदन बनसोडे, प्रा.हेंमत साळुंखे, प्रा.तुषार पाटील, प्रा.डॉ. अविंत पाटील, प्रा.डॉ.दिपक पाटील, प्रा.ललित विसपुते, प्रा.रवींद्र टोंगळे, प्रा.विशाल जाधव यांनी परिश्रम घेतले.