जळगाव । येथील दिशा स्पर्धा परिक्षा केंद्रातर्फे स्पर्धा परिक्षांच्या अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी गणित विषयावर एक दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथील प्रमुख वक्ते प्रा. किरण पाटील यांनी गणित विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिशा स्पर्धा परिक्षा केंद्रातर्फे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळा घेण्यात येत असतात.
मोफत कार्यशाळा घेणार..
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. वासुदेव पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा. कपीलदेव कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मदन बनसोडे यांनी मानले. यातच कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राहूल नरवाडे, नरेंद्र पाटील यांच्या सहकार्य लाभले. दरम्यान, दिशा स्पर्धा परिक्षा केंदातर्फे नेहमी आयोजित करण्यात येणार्या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक वासुदेव पाटील यांनी केले आहे.