दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक कोल्हापुर शाखेचा शुभारंभ

0

जळगाव : दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक कोल्हापूर शाखेचे उद्घाटन 20 रोजी करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टिस्टेट शेडयुल्ड बँक 83 वर्षांपासून कार्यरत आहे. बँकेच्या जळगाव, धुळे, नासिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, मलकापुर, बुलढाणा, बुरहानपुर-मध्यप्रदेश येथे एकूण 37 शाखा कार्यरत आहेत. श्री महालक्ष्मी देवीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराबाई व शाहु महाराज यांच्या कर्तृत्वाने पुनीत झालेल्या कोल्हापुर नगरीत, दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँक शाखेचा अनंत टॉवर, रेल्वे फाटक ते राजारामपुरी रोड, कोल्हापुर येथे दै.सकाळ चे मुख्य संपादक श्रीरामजी पवार व घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे चेअरमन व एमडी किरणजी पाटील यांचेहस्ते शुभारंभ करण्यात आला.ले आहे.