दीड लाखाची फसवणूक; एकावर देवपूर पोलिसात गुन्हा

0

धुळे । धुळे शहरालगत असलेल्या वाडीभोकर येथील एका अ‍ॅग्रो सायन्स कंपनीची दीड लाखात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित एकाविरुध्द देवपूर पश्‍चिम पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राजकोट येथे पॅक मेकर मशिन प्रा.लि.कंपनीचा प्रतिनिधी आहे, असे सांगून कृष्णा अ‍ॅग्रो सायन्स कंपनीस व राकेश पाटील (वाडीभोकर)यांना खतांचे पाकीट तयार करणार्‍या मशिनचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. या दरम्यान कंपनीचा व फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. नितीन टंक याने कंपनीचे खोटे कागदपत्र दाखवून मशिनचे कोटेशन पाठविले. त्यावर विश्‍वास ठेवून भोकर येथील सदर कंपनीचा एक लाख ५० हजाराचा धुळे येथील पंजाब नॅशनल बँकेचा ड्रॉफ्ट नितीन टंक याने स्वीकारला व त्या बदल्यात मशिन न पाठवता कंपनीचे विश्‍वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी संशयित नितीन टंक (रा.न्यू वलवाडी, राजकोट (गुजरात) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.