दीड लाखासाठी विवाहितेचा छळ : चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : मूलबाळ होत नाही तसेच माहेरून प्लॉट घेण्यासाठी दीड लाख रुपये आणावेत या कारणावरून तालुक्यातील बिलवाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा
कविता ऊर्फ भैरवी यांचा काही वर्षापुर्वी शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील लहु देविदास बागुल यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासू जेठ नणंद यांनी कविता हिस प्लॉट घेण्यासाठी तिच्या माहेरून दीड लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. यासह कविताला मूलबाळ होत नाही या कारणावरून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. एके दिवशी कविताला तिच्या पतीने मारहाण करून घराच्या बाहेर काढून दिले पैसे आणल्याशिवाय परत येऊ नको असा दम दिला. अशा आशयाच्या कविता ऊर्फ भैरवी बागूल या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पती लहू बागूल, सासू नादरबाई देविदास बागुल, जेठ कुश देविदास बागुल, नणंद प्रतिभा चंद्रकांत सोनवणे (सर्व रा.कळमसरे, ता.शिरपूर) यांच्याविरोधात रविवार, 20 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहेत.