जळगाव । सिताबाई गणपत भंगाळे माध्य. विद्यालय व आप्पासाहेब जे.एस.शिंदे प्राथमिक विद्या मंदीरात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, माजी महापौर विष्णु भंगाळे, रेखा कुळकर्णी, जितु परदेशी, जयश्री पाटील, कुमावत ताई, पिंताबर इंगळे, रामदास पाटील, सुहास बोरोले, लक्ष्मण धांडे, रिंकु चौधरी, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यावेळी तालुक्याचे विज्ञान विषय समिती सदस्य, जि.प.शाळा बिलवाडी येथील उपशिक्षक संदीप पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक धड्याला एक शिक्षक याप्रमाणे तालुक्याच्या तज्ञ व उपक्रमशील शिक्षकांना डिजीटल अभ्यासक्रमाचे नियोजन करून देण्यात आले. टेक्नोटीचर्स देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा हा उपक्रम नाविण्यपूर्ण असून संपूर्ण जिल्ह्यात अभ्यासक्रमात एक वाक्यात येण्यास व शिक्षकांच्या सृजणशिलतेस वाव मिळण्यासाठी उपयोगी पडेल असे मनोगतात सांगितले. गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सर्व शिक्षकांनी जास्तीत जास्त वाचन करून युट्यूब चा वापर करून अभ्यासक्रम तयार करावे असे सांगितले.