दीपक कपूर ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी

0

मुंबई | झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचे प्रधान सचिव दिपक कपूर यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. विश्वास पाटील यांच्या निवृत्तीमुळे ही जागा रिक्त झाली होती. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याकडे हा तात्पुरता प्रभार सोपविण्यात आला होता.

विश्वास पाटील यांनी निवृत्तीआधी पाच दिवसात 450 फ़ाईली निकाली काढल्याने या पदाबाबत अलीकडे जोरदार चर्चा सुरु झाली होती. 450 पैकी फक्त 200 फाइलीच प्रभारी म्हैसकर यांना तपासणीत हाती लागल्या होत्या. या अधिकाऱ्यांच्या हाती आल्या. त्यामुळे पाटील यांनी निवृत्तीच्या शेवटच्या कालावधीत निकालात काढलेल्या सर्वच फाइली आता चौकशीच्या चक्रव्यूहात अडकल्या आहेत. एसआरए’चे सीईओ म्हणून मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील असलेले ठाणे महापालिका आयुक्त राजीव जैस्वाल यांच्या नियुक्तीची अटकळ बांधली जात होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दीपक कपूर यांना या जागी बसवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

प्रदीप व्यास यांची नियुक्ती
राष्ट्रीय आरोग्य कार्याक्रमाचे (एनएचएम) संचालक व कुटुंब कल्याण आयुक्त असलेले प्रदीप व्यास यांचीही आरोग्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.