दीपक मिश्रा नवे सरन्यायाधीश

0

नवी दिल्ली : येत्या 27 ऑगस्टरोजी सेवानिवृत्त होत असलेले देशाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या जागी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. न्यायमूर्ती मिश्रा हे 3 ऑक्टोबर 2018 पर्यंत सरन्यायाधीश पदावर राहतील.

न्यायमूर्ती मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करताना अनेक ऐतिहासिक निकाल दिलेले आहेत. त्यात याकूब मेमन याच्या याचिकेवर रात्रभर सुनावणी घेऊन त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. याशिवाय, निर्भयाकांडातील आरोपींनाही त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. देशभरातील चित्रपटगृहात राष्ट्रगीत सक्तीचे करण्याचा आदेशही त्यांनीच काढला होता. याशिवाय, बीसीसीआयमध्ये सुधारणा, नीट परीक्षा व सुब्रतो रॉय यांच्याशी निगडीत सेबीच्या प्रकरणातही त्यांनी महत्वपूर्ण निकाल दिलेले आहेत. 11 ऑगस्टरोजी रामजन्मभूमी विवादप्रकरणी सुनावणीसाठी गठीत केलेल्या विशेष न्यायपीठाचे नेतृत्वही न्यायमूर्ती मिश्रा हेच करत आहेत.