दीपक सावंत यांनी राजीनामा दिल्याने आरोग्य खात्याचा पदभार एकनाथ शिंदेंकडे !

0

मुंबई – आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपला कार्यकाल संपल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. सावंत यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असून आरोग्य खात्याचा अधिभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. आज दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे.