वरणगाव: – दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून राखेची विल्हेवाट लावणार्या पाईपमधून गळती झाल्याने वरणगाव येथील नारायण मोतीराम शेळके या शेतकर्याचे पाच लाखाचे नुकसान झाले. याबाबत शासकीय पंचनामे करण्यात आला. नारायण शेळके यांचे वरणगाव शिवारात शेत गट नंबर 710 मधून राखेची विल्हेवाट लावणारी पाईप लाईन गेली आहे.
ही पाईप लाईन लिकेज झाल्याने कापसाचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याबाबत पाच लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. राख शेत पसरल्याने शेत नापिक झाले आहे . शेतकर्यांने 2006 पासून लेखी तक्रारी करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेतकर्याने उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.